‘मूळ पवार आणि बाहेरच्या पवार’ अजितदादांच्या सख्ख्या वहिनीचं प्रत्युत्तर

शर्मिला पवार

बारामती : चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असा मुद्दा मांडत सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन अजित दादा करताना दिसून येत आहेत. त्यावरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘मूळ पवार आणि बाहेरच्या पवार’ असे सूचकपणे ते म्हणाले.

याचाच अर्थ सुनेत्रा पवार या मूळ पवार नाहीत, असेच त्यांना सुचवायचे होते. त्यावरून गेली काही दिवस अजित पवार हे सातत्याने सभांमधून शरद पवारांच्या टीकेला उत्तर देत आहेत. मात्र आज अजित पवार यांच्या सख्ख्या भावजयीनेच त्यांच्या वाक्याला छेद दिला.

बारामतीत आज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, तसेच पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. याच मेळाव्यात शर्मिला पवार बोलत होत्या.

Related News

मी नणंदेची जागा कधीही घेणार नाही, सुप्रियांचा मूळ डीएनए पवारांचा

शर्मिला पवार यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना हा मुद्दा छेडला आणि सांगितले की, “मी नणंदेची जागा कधीही घेणार नाही. आम्ही बाहेरच्या आहोतच. मूळ डीएनए जो पवारांचा आहे तो सुप्रिया सुळे यांच्यामध्येच आहे, त्यामुळे जे वाक्य वापरले गेले ते काही चुकीचे नाही असे मी मानते”.

शर्मिला पवार या अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास यांच्या पत्नी आहेत. त्या शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. इंदापूर व बारामती तालुक्यात या फाउंडेशनने सामाजिक काम केले आहे. आज त्यांना महाविकास आघाडीच्या महिला मेळाव्यात बोलण्याची संधी दिली, तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर मत व्यक्त केले. आता त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सुनेत्रा पवार, सुळे यांना नोटिसा

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याचे समोर आले आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील ‘शॅडो रजिस्ट्रर’ खर्चात तफावत आढळली आहे.

त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय़ अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजाविली असून, ४८ तासांत खुलासा करण्याची सूचना केली आहे.

अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला

‘कार्यकर्त्यांना न मागता पदे दिली. प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला. तरीही त्यांनी निवडणुकीत दगाफटका केल्यास माझ्या घराची पायरी चढायची नाही. गाठ माझ्याशी आहे,’ असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना रविवारी भरला.

Related News