पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी

पावसाळा

पावसाळा सुरू होण्याआधीच अनेकांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते.

पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात.

Related News

ऐन पावसाळ्यात ऊन तापत असल्याने ‘मे’ हीट सदृश्य परिस्थितीने

शरीराची लाहीलाही होते.

कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात.

त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे:

पावसाळ्यात जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा मोह टाळा.

पावसाळ्यात हलका व पौष्टिक आहार घ्या.

पावसाळ्यात सुका मेवा कमी प्रमाणात खावा.

जेवणात फळे, सलाड व ज्यूस घ्या.

उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

पावसाळ्यात सर्दी होऊ नये म्हणून चहामध्ये अद्रकाचा वापर करा.

आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळे जसे की संत्री, पेरू आणि स्ट्रॉबेरी

यासारखी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ खा.

आहारात कडधान्यांचा समावेश अधिक करा.

आहार हा ताजा व गरम सेवन करावा, फ्रीज मधील पदार्थ, पेय व भाज्या खाणे टाळावे.

त्याने या ऋतुमधे वात व कफ वाढुन वात विकार तसेच सर्दी चटकन होते.

आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा,

यात तांदुळ, गहु तसेच विविध डाळी भाजुन यांपासुन वेगवेगळे आहार पदार्थ बनवुन त्याचे सेवन करावे.

Read also: पावसाळ्यात स्टायलिश दिसायचे आहे? फॉलो करा ह्या फॅशन टिप्स (ajinkyabharat.com)

Related News