मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न
असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही.
मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे
सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे.
मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये,
प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले.
महाराष्ट्र केंद्र सरकारला सर्वात जास्त कर संकलन करुन देते
मात्र राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो.
मागील महिन्यातच जाहीर झालेल्या आकडेवारीत महाराष्ट्रापेक्षा
इतर राज्यांना जास्त निधी दिला हे वास्तव आहे, असे नाना पटोले म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbals-new-state-cow-slaughter/