मोबाईलच्या उधारीतून मानहानी, मारहाणीचा ताण – युवकाची आत्महत्या; ६ जणांवर गंभीर गुन्हे दाखल

मोबाईलच्या उधारीतून मानहानी, मारहाणीचा ताण – युवकाची आत्महत्या; ६ जणांवर गंभीर गुन्हे दाखल

तेल्हारा | प्रतिनिधी

तेल्हारा तालुक्यातील जस्तगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून,

मोबाईलच्या उधारीवरून झालेल्या जबर मारहाणी व गावात मानहानी झाल्याच्या मानसिक तणावाखाली

Related News

सागर शंकर चिकटे (३०) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

 कोणावर गुन्हा दाखल?

  • विनय राऊत

  • विनीत गजानन युतकार

  • यश गजानन युतकार

  • उमेश पांडे (रा. तेल्हारा)

  • राम प्रशांत मोकळकार (रा. भोकर, ता. तेल्हारा)

  • अक्षय भारसाकळे (रा. वाडी)

 घटनेचा तपशील

फिर्यादी सचिन रामाजी चिकटे (२८) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार,

सागर चिकटे यांनी श्रावणी मोबाईल शॉपीतून मोबाईल उधार घेतला होता.

उधारीची रक्कम देण्यास त्याने दुसऱ्या दिवशीची मुदत मागितली होती.

मात्र, यश युतकार याने त्याचे न ऐकता सागरला मारहाण सुरू केली.

15 मे रोजी सायंकाळी, फोर व्हीलरमधून आलेल्या पाच जणांनी सागरला गावात मारत फिरवले,

गावात त्याची प्रतिष्ठा मातीमोल केली आणि शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर त्याला गाडीत टाकून घेऊन गेले, आणि तो पुन्हा रात्री घरी परतला नाही.

 शेवटचा क्षण

16 मे रोजी सकाळी 8 वाजता, मनोहर चिकटे शेतात कामासाठी गेला असता,

त्याला सागर चिकटे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेली अवस्था दिसून आली. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 कायदेशीर कारवाई

तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी IPC 2023 अंतर्गत कलम 137(2), 108(3)(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सुनील भटकर करत आहेत.

ही घटना गावातील कर्ज, सामाजिक दबाव आणि खाजगी बेइज्जतीचा मिळून झालेला दुर्दैवी परिणाम

असल्याचे स्थानिक नागरिक म्हणत आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-14-kg-ganjasah-tighanna-stuck-sadeetin-lakhancha-issue/

Related News