मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जीवनपट उलगडणार ‘येक नंबर’

महाराष्ट्राच्या

महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी छाप पाडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बायोपिकची पहिली झलक समोर आली आहे.

राज ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या चित्रपटाचं नाव ‘येक नंबर’ असं आहे.

Related News

मनसे नेते अविनाश जाधव यांनी या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री तेजस्विनी पंडित, झी स्टुडिओज् आणि

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने केली आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित हा

चित्रपट 10 ॲाक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित

‘येक नंबर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेने तोंड करून

उभा असलेला एक तरुण दिसत असून त्याच्या जॅकेटवर

‘मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा’ असे लिहिले आहे.

चित्रपटात काय असेल याबद्दल आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-high-court-gives-important-orders-regarding-laser-dance-in-festivals/

Related News