पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार सतीश चव्हाण 6 वर्षांसाठी निलंबित

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची कारवाई

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आज

पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार सतीश चव्हाण यांना सहा

Related News

वर्षांसाठी निलंबित केले आहे. चव्हाण हे महाराष्ट्राच्या विधान

परिषदेत औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सतीश चव्हाण

यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या

नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आणि महायुती सरकारला

बदनाम करण्यासाठी हेतुपुरस्सर पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल

पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांना सहा वर्षांसाठी निलंबित

करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी

महायुतीने पावले उचलली आहेत. चव्हाण यांच्या कृतीवर

शिस्तभंगाची कारवाई आवश्यक असल्याचं तटकरे यांनी म्हटलं

आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान

परिषदेवर निवडून आलेल्या चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी मराठा

समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल महायुती

सरकारवर टीका करणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. मराठा, धनगर

आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात महायुती

सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला होता.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी

बुधवारी चव्हाण यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली

होती. महायुती सरकार सर्व नागरिकांच्या हितासाठी काम करत

असताना अशा प्रकारचे वक्तव्य चुकीचे असल्याचे तटकरे यांनी

म्हटले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा

केल्यानंतर तटकरे यांनी आज चव्हाण यांना सहा वर्षांसाठी

निलंबित केले. यासंदर्भात सुनील तटकरे यांनी एक पत्र जारी केलं

आहे. या पत्रात म्हटलं आहे की, ‘सतीश चव्हाण यांनी 15

ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात

प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका

घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची

भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे

असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग

केली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई

करण्यात आली आहे.’

Read also: https://ajinkyabharat.com/shrikant-shinde-violated-the-rules-in-mahakal-temple-of-ujjain/

Related News