चित्रपट निर्मात्या किरण रावकडून जपानी ट्रेलर शेअर
चित्रपट निर्माता किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ भारतात गाजल्यानंतर
जपानमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
चित्रपटाचा जपानी भाषेतील ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर करत किरण राव
यांनी माहिती दिली. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता यांच्या प्रमुख
भूमिका आहेत. पोस्टमध्ये किरण राव यांनी लिहिले, ‘लापता लेडीज 4 ऑक्टोबर
2024 पासून जपानमध्ये पाहायला मिळेल! आम्ही शोचिकू, जपान – arigato
gozaimasu! (sic) द्वारे जपानमध्ये चित्रपटाच्या थिएटर रिलीजसाठी उत्सुक आहोत.’
लापता लेडीज’ ही दोन नववधूंची कथा आहे, ज्यांची भूमिका नितांशी गोयल
आणि प्रतिभा रंता यांनी केली आहे. ज्यांची ट्रेनमध्ये अदलाबदल होते. चित्रपट
विनोदी पण पितृसत्तेला आव्हान देतो. यापूर्वी हा चित्रपट सर्वोच्च न्यायालयात
प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 1 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. मात्र, नेटफ्लिक्सवर
चित्रपटाने यापेक्षाही चांगली कामगिरी केली होती. आमिर खान चित्रपटात
सह-निर्माते आहेत. लपता लेडीजमध्ये स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम
आणि गीता अग्रवाल शर्मा देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट बिप्लब गोस्वामी
यांच्या एका पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई
यांनी रचले आहेत, अतिरिक्त संवाद दिव्यानिधी शर्मा यांनी दिले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/3-hours-discussion-between-manoj-jarange-and-abdul-sattar/