3 महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा- कुटुंबियांचा आरोप.

पिंजर

पिंजर पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा- कुटुंबियांचा आरोप

आमची मुलगी मागील तीन महिन्यापासून बेपत्ता आहे,

पिंजर पोलीस अजूनही मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरत आहेत,

Related News

जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन आमच्या प्रकरणाकडे

दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलगी

मागील 3 महिन्यांपासून बेपत्ता आहे.

मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पिंजर पोलीसात दाखल करूनही

पोलिस प्रशासन सदर प्रकरणात हलगर्जीपणा करत आहे.

कुटुंबियांनी गणेश काळे या तरुणावर संशय व्यक्त केला होता,

मात्र अद्यापही पोलिसांनी गणेश काळे याची चौकशी केली नसल्याचे समजते.

अखेर मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली, आणि तक्रार मांडली.

मुलीच्या पालकांनी पिंजर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पोलिस प्रशासन गणेश काळे याची पाठ राखण का करत आहे

असा प्रश्नही नातेवाईकांनी पोलिस आधीक्षकांना विचारला.

Read also: https://ajinkyabharat.com/i-came-to-manorama-khedkarla-till-20th-july-police-kothadi/

Related News