मेळघाट, 14 एप्रिल 2025 (सोमवार) – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहानूर
सफारीदरम्यान पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव लाभला.
गुल्लरघाट तलावाजवळ उन्हाळ्यात तयार होणाऱ्या हिरव्या गवताळ मैदानात एका
Related News
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
रुबाबदार वाघिणीचे दीड तास दर्शन झाल्याने निसर्गप्रेमींना मोठा आनंद झाला.
निसर्गप्रेमी आदित्य दामले, छायाचित्रकार मिलिंद जोग आणि वनमित्र
राजेश बाळापुरे यांनी शहानूर सफारीदरम्यान हा दुर्मीळ क्षण अनुभवला.
तलाव परिसरात चरत असलेल्या चितळ, सांबर यांच्यामुळे वाघ नसावा असे वाटत असतानाच,
मधोमध असलेल्या पाणवनस्पतींमध्ये एक वाघीण निवांत आरामात आढळून आली.
मिलिंद जोग यांनी आपल्या कॅमेऱ्यात त्या वाघिणीच्या विविध पोझेस फटाफट रेकॉर्ड केल्या.
वाघीणही अगदी व्यावसायिक मॉडेलप्रमाणे , कधी डोळ्यांनी नजर भिडवत,
तर कधी थोडंशी हालचाल करत पर्यटकांशी ‘आय कॉन्टॅक्ट’ करत होती.
या क्षणावर बोलताना आदित्य दामले म्हणाले, “आठवीस वर्षांच्या निसर्ग निरीक्षणाच्या
तपश्चर्येला आज खऱ्या अर्थाने फळ आलं. तलावाच्या मध्यभागी इतक्या शांततेने वाघीण झोपली होती
की परिसरातील इतर प्राणीही तिच्या अस्तित्वाची कल्पना करू शकले नाहीत.
चितळ, सांबर, मोर मुक्तपणे चरत होते, माकडं जमिनीवर बसलेली, पण कुणीही कॉल दिला नाही!”
रणथंबोरच्या ‘मछली’ प्रमाणे ही वाघीणही प्रसिद्ध होईल, असा विश्वास दामले यांनी व्यक्त केला.
त्यांनी या वाघिणीस “लेडी ऑफ लेक” असे नाव दिले असून,
ही देखणी वाघीण मेळघाटमधील पर्यटकांसाठी लवकरच आकर्षण ठरणार आहे.