मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
आपल्या भावाकडून आणि वहिनीकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत न्यायासाठी एसएसपी कार्यालय गाठलं.
विशेष म्हणजे, अजीम याचं लग्न जबरदस्तीने त्याच्यापेक्षा तब्बल
२५ वर्षांनी मोठ्या असलेल्या विधवा महिलेशी लावल्याचा आरोप त्याने केला आहे.
‘मुलीशी लग्न आहे’ म्हणून फसवणूक
तारापुरी भागात राहणारा अजीम हा आपल्या मोठ्या भाऊ नदीम आणि वहिनी शायदा यांच्यासोबत राहतो.
अजीमच्या सांगण्यानुसार, ईदच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च रोजी त्याची वहिनी शायदा हिने त्याला फाजलपूर येथे बोलावले.
तिथे आपल्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच मंतशा हिच्याशी लग्न लावून दिलं जाईल, असं सांगण्यात आलं.
अजीमने विश्वास ठेवत लग्नासाठी होकार दिला.
निकाहच्या वेळी समजलं कटकारस्थान
संध्याकाळी फाजलपूरच्या मोठ्या मशिदीत निकाहाची तयारी सुरू असताना, मौलवींनी निकाह वाचण्याआधी
अजीमला समजलं की त्याचं लग्न मंतशाशी नव्हे, तर तिच्या आईशी —
ताहिरा ह्या २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी लावलं जात आहे.
हे ऐकून अजीमने जोरदार विरोध केला.
धमक्या, मारहाण आणि ब्लॅकमेलिंग
अजीमचा आरोप आहे की त्याने विरोध करताच त्याचे भाऊ नदीम,
वहिनी शायदा आणि इतर नातेवाईकांनी त्याच्यावर शारीरिक हल्ला केला
आणि गप्प बसण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे, तर जर त्याने कोणाकडे तक्रार केली,
तर त्याच्यावर खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला जाईल, अशीही धमकी दिली गेली.
एसएसपी कार्यालयात न्यायासाठी धाव
या सगळ्या प्रकारानंतर अजीमने बुधवारी मेरठ येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP)
कार्यालय गाठून एक सविस्तर निवेदन सादर केलं.
त्याने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rajasthanam/