मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते.
Related News
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी
दादरमधील नाबर गुरुजी विद्यालयाच्या बंदतेने मराठी शाळांचे भविष्य अधांतरी
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी:
PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या
गुढीपाडवा ठरेल सोन्याचा दिवस, वाढत्या महागाईत हुशारी दाखवा अन् छोटासा दागिना घ्याच
‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची तिरडी; पुण्यात रणरागिणींचं अनोखं आंदोलन!
मोठी बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक; CSMT वरुन सुटणाऱ्या ५९ लोकल, ‘या’ मेल-एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक
न्यूयॉर्क : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी
अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते. त्यांचे एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्रसुद्धा
समाजमाध्यमांवर वायरल झाले आहे. मात्र सामना झाल्यानंतर रात्रीच त्यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याचे समजते.
ऑक्टोबर २०२२मध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून एमसीएच्या
अध्यक्षपदी निवड झालेले अमोल यांचे नाव क्रीडा विश्वातसह राजकीय वर्तुळातही चर्चेत आले होते.
त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली मैत्री हीदेखील
सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष होते.
अमोल यांनी एमसीएचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मुंबई क्रिकेटच्या हितासाठी असंख्य मोलाचे निर्णय घेतले.
त्यांनी मुंबईच्या रणजीपटूंचे सामन्याचे मानधन दुप्पट केले.
तसेच रणजी विजेत्या मुंबई संघालाही कोटींच्या घरात रोख पारितोषिक जाहीर केले. नुकताच वांद्रे येथेही ‘होम
ऑफ चॅम्पियन्स’ची सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन
तेंडुलकरचा वानखेडे स्टेडियमवर पुतळाही त्यांच्याच कल्पनेतून साकारण्यात आला.
त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे…
Read Also https://ajinkyabharat.com/dhoni-has-been-visiting-france-for-the-past-few-days/