मेट्रोचं उद्घाटन न झाल्याने मविआ आक्रमक!

पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास

आघाडीकडून आंदोलन करण्यात त आहे. शिवाजीनंगर ते स्वारगेट

या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी मविआच आंदोलन सुरू असून

Related News

कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांच्या हस्ते या मार्गाच उद्घाटन होणार होत, मात्र पावसामुळे

त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आणि हे उद्घाटनही लांबणीवर पडलं.

मात्र यामुळे पुण्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप

केला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता येत्या रविवारी

या मेट्रो मार्गाचं ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत. मात्र त्या

आधीच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. सिव्हिल

कोर्ट मेट्रो स्टेशनबाहेर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करत

आंदोलन सुरू आहे. नरेंद्र मोदी हाय हाय अशा घोषणाही देण्यात

आल्या आहेत. आजच्या आज मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करावं अशी

मागणी मविआकडून करण्यात येत आहे. आक्रमक झालेले

कार्यकर्ते मेट्रो स्टेशनच्या आत घुसण्यााठी प्रयत्न करत आहेत.

मात्र याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला

असून मेट्रो स्टेशनच्या आत जाण्याची परवानगी नसल्याने पोलिस

त्यांना रोखत आहेत. मात्र त्यामुळे आंदोलक आणि पोलिस

यांच्यात बराच वाद सुरू असून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

मेट्रो सुरू होईपर्यंत घरी परत जाणार नाही अशी भूमिका

कार्यकर्त्यांनी घेतली असून मेट्रो स्टेशनबाहेरील वातावरण एकंदर

खूप तापल्याचं दिसत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/attempt-to-vandalize-the-office-of-minister-devendra-fadnavis/

Related News