पुणे येथील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग

कोणतीही जीवितहानी नाही

पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला काल मध्यरात्री आग लागली.

जी अग्निशमन दलाने तातडीने आटोक्यात आणली. मेट्रो

Related News

प्रशासनाने या आगीबाबत सोमवारी दिलेल्या अधिकृत निवेदनात

म्हटले आहे की, स्थानकाच्या तळमजल्यावर घडलेल्या या घटनेत

कोणीही जखमी झाले नाही. तसेच, कोणत्याही प्रकारची जीवित

हानी झाली नाही. तळमजल्यावर असलेल्या फोमच्या साहित्याला

आग लागल्याने ही घटना घडली. दरम्यान, ही आग नेमकी

कशामुळे लागली याबाबत चौकशी सुरु असल्याचेही प्रशासनाने

म्हटले आहे.

पुणे अग्निशमन विभागाने पुष्टी करताना म्हटले की, मध्यरात्री 12

वाजण्याच्या सुमारास स्टेशनवर वेल्डिंगच्या कामादरम्यान फोम

सामग्रीला सुरुवातीला आग लागली. जी फोमच्या साहित्यापर्यंत

पसरली. ज्यामुळे आगीचा भडका उडाला. “मध्यरात्रीच्या सुमारास

बांधकामाच्या कामात वापरलेले फोम पेटले, ज्यामुळे संपूर्ण

स्थानकावर मोठा धूर पसरला. आमच्या चमूने अग्निशमन दलाच्या

पाच गाड्यांसह त्वरित प्रतिसाद दिला आणि पाच मिनिटांत

परिस्थिती नियंत्रणात आणली “, असेही अग्निशमन विभागाच्या

अधिकाऱ्याने सांगितले.

Read also: https://ajinkyabharat.com/if-there-are-more-than-two-mule-he-will-contest-the-election/

Related News