मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांना स्थलांतर करावे लागले आहे. या महापुरात शेताची पिकं नष्ट झाली आहेत, जनावरांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 8 जणांचा जीव गेला आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला आहे की, सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा द्यावा. त्यानुसार मराठवाड्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे दौरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सोलापूर आणि लातूर जिल्हा
उपमुख्यमंत्री अजित पवार – सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्हा
Related News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – धाराशिव जिल्हा
पालकमंत्री आणि इतर सर्व मंत्रीही त्यांच्या संबंधित जिल्ह्यांच्या पूरस्थितीची पाहणी करतील.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज
विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत सुमारे 23% शेती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हवामान विभागाने या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता सांगितली आहे.विरोधक पक्षांनीही तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार रोहित पवार यांनी हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली, तर सुप्रिया सुळे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्या निधीचा उपयोग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करावा, अशी मागणी केली.
मदतीची ग्वाही
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीनंतर पूरग्रस्तांना तातडीने मदतीसाठी जीआर काढण्यात आले आहे, आणि पुढच्या आठ दिवसांत 2,215 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदतकार्य पाहण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार-खासदारांनी केली पहाणी
ओमराजे निंबाळकर – धाराशीवर, वडनेर; आजी आणि दोन वर्षीय मुलाला वाचवले
अमित देशमुख – लातूर; शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामाअनुसार आढावा
अब्दुल सत्तार – सिल्लोड; पूरग्रस्तांना साहित्य वाटप
गुलाबराव पाटील – जळगाव, पाचोऱ्या तालुका; अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
सुरेश धस – बीड, आष्टी; पाटोदा, भाकरेवस्ती, पारगाव आणि मांजरा नदीकाठ गावांना भेट
मराठवाड्यातील महापुरामुळे परिस्थिती गंभीर असून, प्रशासन आणि राजकीय नेते मैदानात उतरून शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/dinddhar-yadyankan-program-jaheer-gulal-kuncha-udanar/#google_vignette
