मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत खासदार काळेंना आंदोलकांचा घेराव

जालना

जालना शहरात शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत

मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली.

या रॅलीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना मराठा आंदोलकांनी

Related News

घेराव घालून मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

जालना शहरात मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी

जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव सकाळपासून दुचाकी व चारचाकी वाहनातून येताना दिसून आले.

शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या भगव्या ध्वजांमुळे

संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.

छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली.

दहा वाजता सुरू होणारी ही रॅली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुरू झाली.

रॅली दरम्यान तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी

आणि मोठ्या फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आले.

या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा युवक सहभागी झाले आहेत.

रॅली दरम्यान काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना

मराठा आंदोलकांनी घेराव घालून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

Read also: https://ajinkyabharat.com/rpaila-legislative-assembly-12-jaga-mitavyat-ramdas-athawale/

Related News