मुंबई : राज्यात प्री-मान्सून पावसाने जोरदार एंट्री घेतली असून हवामान विभागाने आज (21 मे) 22
जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यातील अनेक भागांत ऑरेंज व येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
गौसेवेचा संकल्प घेत विद्यार्थ्यांनी अनुभवले गोमातेचे महत्त्व
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव,
छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या
जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानाचा अंदाज आणि इशारे :
-
वाऱ्याचा वेग 40 किमी प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो
-
विजांसह मुसळधार पावसाचा इशारा
-
कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
-
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागांत येलो अलर्ट
गावी पावसाने गारवा, शेतकऱ्यांची तयारी सुरू
पावसामुळे राज्यात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानात घट झाली
असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही आशा निर्माण झाली असून,
मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत शेतकरी पेरणीपूर्व तयारी करत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 25 ते 27 मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि जूनच्या पहिल्या
आठवड्यात कोकण, मुंबईत तर दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pm-kisan-20/