Manoj Jarange Patil साठी चार तरुणांचे आमरण उपोषण; ठिकठिकाणी रास्ता रोको, उद्या परभणी बंदची हाक
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक आक्रमक | नांदेड, संभाजीनगर, धाराशिव आणि जालन्यात आंदोलन तीव्र
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सलग उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. जरांगे यांच्या समर्थनार्थ विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलने सुरू झाली असून, नांदेडमध्ये चार तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, परभणी जिल्ह्यात उद्या बंदची हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही विविध ठिकाणी देण्यात आला आहे.
Related News
Manoj Jarange Patil : नांदेडमध्ये चार तरुणांचे आमरण उपोषण
Manoj Jarange Patil यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. भोकर तहसील कार्यालयासमोर एका मराठा तरुणाने आमरण उपोषण सुरू केले आहे. बालाजी पाटील कदम बटाळकर हे मागील चार दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करत असून, सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय नांदेड जिल्ह्यातील निवघा बाजार येथे जलकुंभावर बसून लक्ष्मण पाटील कदम आणि ओमप्रकाश पाटील कदम हे दोन तरुण आमरण उपोषण करत आहेत. तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोपान नेव्हल पाटील यांनीही आमरण उपोषण सुरू केले आहे.
चारही तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
परभणीत उद्या जिल्हा बंदची हाक
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले.
जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी आंदोलकांनी तब्बल दीड तास रास्ता रोको केला. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, आंदोलकांनी उद्या परभणी जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
पैठणमध्ये मराठा समाज आक्रमक
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातही मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
पैठण शहरातील सह्याद्री नाका चौकात मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको करत सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धाराशिवमध्ये टायर पेटवून रास्ता रोको
Manoj Jarange Patil यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातही सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. धाराशिव-औसा रोडवरील चिखली फाटा येथे मराठा समाज बांधवांनी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
टायर पेटवून करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जालन्यात धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातही आंदोलनाची धार वाढली आहे. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. महामार्गावर आंदोलन झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता
Manoj Jarange Patil यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको, आमरण उपोषण आणि बंदची हाक देण्यात आल्याने आंदोलनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.
नांदेडमध्ये चार तरुणांचे आमरण उपोषण, परभणीत जिल्हा बंदची हाक, तर संभाजीनगर, धाराशिव आणि जालन्यात रास्ता रोको आंदोलन झाल्याने सरकारसमोर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आता सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते आणि आंदोलकांच्या मागण्यांबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आल्याने आगामी काळात परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sanjay-raut-3/
