मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न; हेमंत गावंडे यांचा मृत्यू

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा;

दिनांक रविवार १६ मार्च रोजी रात्री १० वाजता अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक

४ वर अकोट-अकोला मेमो ट्रेनने प्रवास करीत हेमंत गावंडे व त्यांची पत्नी आपल्या मुलासह

रेल्वे स्थानकावर पोहोचले असता याच रेल्वेने त्यांच्यावर पाळत ठेवून प्रवास करीत आलेल्या

Related News

चोरट्याने सौ हर्षा हेमंत गावंडे यांचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला,

हेमंत गावंडे यांना चोरटा पळून जाताना दिसताच त्यांनी सदर चोराचा पाठलाग करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.

रेल्वे स्टेशन जवळील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरटा व हेमंत गावंडे यांच्यामध्ये झटापट होऊन

चोरट्याने हेमंत गावंडे यांना गंभीरित्या जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला,

उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला होता, या सर्व बाबींमध्ये पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे

माझ्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतक हेमंत गावंडे यांच्या पत्नी हर्षा गावंडे यांनी केला आहे,

आज हिवरखेड येथील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता,

यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची

मागणी यावेळी मृतक हेमंत गावंडे यांच्या नातीवाईकांनी केली आहे,

सदर प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या जीआरपी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक

अर्चना गाढवे यांच्या सह घटनेच्या दिवशी ड्युटीवर हजर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे,

मृतकाच्या मुलाचे संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाने घ्यावी,

मृतकाच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी तसेच सदरचे प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टात चालवावे

अशी मागणी यावेळी मृतक हेमंत गावंडे यांच्या नातेवाईकांनी केली होती.

Related News