मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ

मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ

बाळापूर (अकोला) प्रतिनिधी

बाळापूर शहरातील मन नदीच्या पात्रात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून

आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला.

Related News

सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तसेच त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हेही स्पष्ट झालेलं नाही.

पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि उत्सुकता निर्माण झाली असून, बाळापूर पोलीस तपासात व्यस्त आहेत.

मृत व्यक्तीची ओळख पटवणे आणि मृत्यूमागील कारण शोधणे हा पुढील तपासाचा भाग असणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/dindyad-yadi-achayukteasathi-akot-tehsil-office-blo-and-supervisor-training/

Related News