मालगाडी अंगावरुन गेली, तरी महिला जिवंत बाहेर, सोलापुरात सफाई कर्मचाऱ्याच्या सल्ल्यामुळे वाचला जीव

मालगाडी अंगावरुन गेली, तरी महिला जिवंत बाहेर, सोलापुरात सफाई कर्मचाऱ्याच्या सल्ल्यामुळे वाचला जीव

सोलापूर रेल्वे स्थानकात एका महिलेच्या अंगावरुन मालगाडी जाऊनही ती वाचली,

या घटनेनंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सफाई कर्मचाऱ्याच्या एका सल्ल्यामुळे महिलेचा जीव वाचला.

सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर आश्चर्यकारक घटना घडली आहे.

‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण अनेकांनी ऐकली आहे.

पण या म्हणीचा अनुभव सोलापुरातील एका महिलेने घेतला आहे.

Related News

एका मनोरुग्ण महिलेच्या अंगावरून रेल्वे मालगाडी गेली तरीही मनोरुग्ण महिला जिवंत बाहेर आली.

मंगेश शिंदे या स्वच्छता कर्मचाऱ्याने प्रसंगावधान साधत महिलेला खाली झोपण्याचा इशारा केला होता.

ही महिला सोलापुरातील रेल्वे स्टेशनवरील फलाटवर थांबलेल्या रेल्वेच्या खाली प्रातः

विधीसाठी गेली होती. पण थांबलेली रेल्वे अचानक सुरू झाली. पण सुदैवाने ती वाचली.

रेल्वे सुरू होताच भेदरलेल्या अवस्थेत महिला बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली

सोलापूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्ण महिला भटकंती करत होती.

त्याचवेळी प्रात: विधीसाठी महिला रेल्वे रुळावर बसली होती.

फलाट क्रमांक तीनवर थांबलेल्या मालगाडीच्या खाली प्रातः विधीसाठी गेली होती.

पण इथे थांबलेली मालगाडी अचानकपणे सुरू झाली.

मालगाडी सुरू झाल्याने महिला घाबरून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती.

पण ही बाब तेथील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी मंगेश शिंदे यांना दिसली.

त्यांनी त्या महिलेला तत्काळ वेळ न घालवता खाली बसण्याचा इशारा करत आवाज दिला.

स्वच्छता कर्मचारी मंगेश शिंदे यांच्या सांगण्यावरुन महिला बाहेर न पडता तिथेच रुळामध्ये आडवी झोपली.

महिला जिवंत बाहेर आली

सोलापूर रेल्वे स्थानकावर ही थरकाप घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

अंगावरून संपूर्ण रेल्वे गेली, काही वेळाने ती महिला जिवंत बाहेर आली.

हा सारा प्रसंग मंगेश यांनीच महाराष्ट्र टाईम्सला सांगितला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर घडली.

प्रसंगावधान साधत मंगेश शिंदेंनी आवाज दिला

मनोरुग्ण महिला रेल्वे रुळावर होती पण तितक्यात ती गाडी सुरू झाली.

त्यामुळे ती महिला घाबरली. ती तेथून उठण्याचा प्रयत्न करत होती, ही बाब मंगेश शिंदे यांनी पाहिली.

यामुळे त्यांनी वेळ न दवडता तिची मदत केल्याने तिचे प्राण वाचले.

घटना घडल्यानंतर ती महिला तेथून मंगेश यांना हात जोडत, त्यांचे आभार मानत तेथून निघून गेली.

More news read here

https://ajinkyabharat.com/shivraj-sinhancha-tutlelya-seatvarun-aircraft-migration-minister-sent/

Related News