मागच्या काही काळात भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते.
पण आता हळूहळ हे संबंध पूर्ववत होत आहेत. मालदीव सरकारने
एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय
घेतला आहे. या 28 बेटांवर पाणी पुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची
कामं आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल.
मालदीवचे राष्ट्रपीत मोहम्मद मुइज्जू यांनी स्वत: ही घोषणा केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. “मालदीवच्या 28 बेटांवर
पाणी पुरवठा योजनांची जबाबदारी एस जयशंकर यांच्याकडे सोपवताना आनंद झाला.
नेहमीच मालदीवची मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि खासकरुन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो” असं मुइज्जू यांनी
त्यांच्याा सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मालदीव आणि भारतामध्ये झालेला हा करार भारत विरोधकांना चांगलाच झोंबणारा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.
मालदीव छोटासा देश असला तरी हिंद महासागर क्षेत्रातील एक प्रमुख देश आहे.
शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य हे भारताच धोरण आहे. मालदीव भारताचा
मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याशिवाय मालदीवमधील पर्यटनात भारताचा मोठा वाटा आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यावर चीनच खूप बारीक लक्ष होतं.
चीनला मालदीव बरोबर खूप खास संबंधांची, सहकार्याची अपेक्षा नाहीय
असं ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटलं आहे. यातून चीनचा जळफळाट स्पष्ट दिसून येतो.
भारताचे मालदीव बरोबर संबंध बिघडवण्यात चीन अपयशी ठरला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ramdas-athawale-is-the-true-heir-of-babasaheb-ambedkar-and-sanjay-raut/