एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना
देशभरात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुका या देशाच्या प्रगतीत
अडथळा बनत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासात अडचणी येत आहेत.
Related News
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घट; पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बुधवारी झालेल्या...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Raj Thackeray निवडणूक आयोगावर आक्रमक; ‘१४ आक्षेपांनंतरही निर्णय झाले, मग कर्ताकरविता कोण?’
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली ...
Continue reading
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत मोठे संकेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल ...
Continue reading
रस्त्याच्या कडेला दिसणारी ‘तोदरी’ नेमकी काय? आयुर्वेदात बिया, पाने आणि फुलांचा पारंपरिक वापर; जाणून घ्या उपयोग
रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत उगवणाऱ्या अन...
Continue reading
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर
मह...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी; 764.7 कोटींच्या सरकारी कामांवरील आरोपांचीही तपासणीमराठा आरक्षणाच...
Continue reading
EPFO PF Claim Update: 20 दिवसांत पीएफ क्लेमचा निपटारा; विलंब झाल्यास काय मिळणार? जाणून घ्या नवा नियम
EPFO PF Claim: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF हा खासगी क्षेत्रातील कोट...
Continue reading
त्यामुळे आता संपूर्ण देशाने ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण
अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण
वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी गुरुवारी देशाच्या 78 व्या
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणाबाबत केलेले वक्तव्य
आगामी काळाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
तब्बल 97 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी
विविध मुद्द्यांना स्पर्श केला. मात्र, त्यांच्या भाषणातील सेक्युलर सिव्हिल कोड
आणि वन नेशन, वन इलेक्शन हे दोन मुद्दे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले.
पंतप्रधान मोदी यांनी देशात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुकांबाबत
भाष्य करताना म्हटले की, देशात कोणतीही योजना राबवायला गेले की त्याचा संबंध
निवडणुकीशी जोडला जातो. निवडणूक आली म्हणून योजना आली, असे बोलले जाते.
एकूणच सगळ्या गोष्टींचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो.
यादृष्टीने One Nation One Election या धोरणाबाबत व्यापक चर्चा झाली आहे.
राजकीय पक्षांनी याबाबत आपले विचार मांडले आहेत. एका समितीने
याबाबत चांगला अहवाल मांडला आहे. आता संपूर्ण देशाने वन नेशन,
वन इलेक्शनसाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे.
भारतातील स्रोतांचा वापर जास्तीत जास्त सामान्य लोकांसाठी करता यावं,
त्याचा अपव्यय कमी व्हावा यासाठी देशात वन नेशन, वन इलेक्शन धोरणाची गरज आहे,
असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला.
देशातील घराणेशाही, जातीयवाद भारताच्या लोकशाहीचे नुकसान करत आहे.
यापासून देशाला मुक्ती मिळाली पाहिजे. त्यासाठी एक मिशन हाती घेतले जाणार आहे.
या मिशनअंतर्गत देशातील राजकारणात 1 लाख तरुणांना पुढे आणले जाईल.
या तरुणांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेल, त्यांचे वडील, काका किंवा
मामा कोणीही राजकारणात नसेल. हे तरुण जिल्हा परिषद, पंचायत, विधानसभा
किंवा लोकसभा कुठेही काम करतील. या तरुणांनी कोणत्या पक्षात यावे,
याची सक्ती नाही. ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. मात्र, यामुळे देशाला घराणेशाही
आणि जातीयवादापासून मुक्ती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
Read also: https://ajinkyabharat.com/maldives-took-a-special-big-decision-for-india/