मलायका अरोराने उचलला रस्त्यावर पडलेला कचरा..

मलायका

सोशल मीडियावर मलायका खूप सक्रिय आहे. ती अनेक फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

मलायका आपल्या आरोग्याबद्दल खूप सजग आहे. मलायकाला फिटनेसची आवड आहे.

Related News

दररोज ती जिम व योगा क्लासेसला जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते.

बऱ्याचदा आपल्या कृतींमुळे ट्रोल होणाऱ्या मलायकाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

मलायकाचा जिम बाहेरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे

. पिवळं जॅकेट व काळ्या शॉर्ट्समध्ये जिमसाठी निघालेली मलायका गेटजवळ थांबते.

ती गेटच्या बाहेर पडलेला कचरा उचलते आणि कचरापेटी शोधते. मात्र तिथे कचरापेटी नसल्याने ती एकाठिकाणी तो कचरा ठेवते

आणि बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकांना त्याबद्दल कळवते. मलायकाचा हा कचरा उचलतानाचा व्हिडीओ

‘फिल्मीज्ञान’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ पाहून चाहते मलायकाचं कौतुक करत आहेत. ‘मन जिंकलंस’,

‘खूप छान’ अशा प्रकारच्या कमेंट्स मलायकाच्या व्हिडीओवर नेटकरी करत आहेत.

मलायका अरोराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत डाउन टू अर्थ, जबाबदार महिला,

मलायका स्वच्छतेचा चांगला संदेश या व्हिडीओतून देत आहे, असं म्हणत आहेत.

दरम्यान, मलायका अरोरा सोशल मीडियावर आपल्या कामा व्यतिरिक्त खासगी आ

युष्यामुळेही चर्चेत असते. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

हे दोघेही एकत्र अनेक इव्हेंट्सना हजेरी लावत असतात.

दोघांचे डिनर डेट व व्हेकेशनचे फोटोही सोशल मिडीयावर खूप चर्चेत असतात.

Read Aloso

https://ajinkyabharat.com/anant-ambani-radhika-merchants-second-pre-wedding-madhala-first-photo-in-front/

Related News