नुकताच ‘येक नंबर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या
दिमाखात पार पडला. या चित्रपटाच्या ट्रेलरचा गाजावाजा सर्वत्र
होताना दिसत आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत असून
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
त्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. सोशल मीडियावर व्ह्यूजचा
आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांकडून असा भरभरून
प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील शीर्षकगीत
प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला अजय-अतुल यांचं
संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता
गांधीने आवाज दिला आहे. तर रॅप सौरभ अभ्यंकरचं आहे. गणेश
आचार्य यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलंय. या गाण्याची
खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी अभिनेत्री
मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत
पदार्पण करत आहे. या रॅपसाँगमधून मलायका तिच्या अदाकारीने
रसिकांना घायाळ करणार आहे आणि यात तिला साथ लाभणार
आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवची. हे आयटम
साँग ऐकायला जितकं एनर्जेटिक आहे तितकंच ते पाहायलाही
कमाल आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यात
सिद्धार्थ एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. या गाण्याबद्दल
अजय गोगावले म्हणाला, “पूर्वी चित्रपटात हमखास आयटम साँग
असायचे. हा प्रकार हल्ली जरा कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा
आम्हाला येक नंबरच्या निमित्ताने आयटम साँग करण्याची संधी
मिळाली. या चित्रपटात आयटम साँग असलं तरी ते विनाकारण
नाही. कारण मुळात कथेची गरज होती. परंतु आपल्याकडे नृत्य
म्हटलं की मराठी ठेका, आपली एक मराठी शैली येते. परंतु
आम्हाला यात काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे याचाच
आधार घेत आम्ही रॅप, हिपहॉप पद्धतीने हे गाणं करण्याचा एक
नवीन प्रयत्न केला आहे.”
Read also: https://ajinkyabharat.com/life-disrupted-due-to-old-age-in-tripura/