Malaika Arora and Arjun Kapoor | मलायका अरोरा – अर्जुन कपूर यांचा 8 वर्षांनंतर झालं ब्रेकअप, दोघांनी घेतला आहे मोठा निर्णय…
अरबाज याच्या लग्नानंतर सर्वांच्या नजरा अर्जुन – मलायका यांच्यावर येऊन थांबल्या होत्या. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.
Related News
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेत्री अर्जुन कपूर यांच्या नात्यात पुन्हा अडचण निर्माण झाली आहे.
अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची
एन्ट्री झाली. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी नात्याची स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका – अर्जुन एकत्र आहेत.
पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी देखील
मलायका – अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. अखेर दोघे विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलायका – अर्जुन एकमेकांचा सन्मान करतात. विभक्त होण्याचा निर्णय देखील दोघांनी
सहमतीने घेतला आहे. दोघांच्या नात्याचा प्रवास आता संपला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवाय मलायका – अर्जुन यांचं नातं फार खास आहे. दोघांच्या मनात एकमेकांसाठी खास स्थान आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी नात्यावर मौन बाळगलं आहे.
कारण सर्वत्र चर्चांना कारण नको म्हणून मलायका – अर्जुन यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
दोघांचं नातं फार काळ टिकलं, पण आता दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
विभक्त झाले असले तरी, दोघे कायम एकमेकांचा आदर करतील… असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे.
विभक्त झाले असले तरी कोणत्याही कठीण परिस्थितीत दोघे एकमेकांसाठी उभे राहतील.
लोकांनी त्यांच्या गोपनियतेचा आदर करावा… असं देखील सांगण्यात येत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका – अर्जुन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, याचवर्षी जानेवारी महिन्यात मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती.
पण दोघांनी नातं संपवण्यापेक्षा नात्यावर काम करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान,
अरबाज याच्या लग्नानंतर सर्वांच्या नजरा अर्जुन – मलायका यांच्यावर येऊन थांबल्या होत्या. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.