“मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”, आरपीएफ जवानाची मनसे नेत्यासोबत मुजोरी

“मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”, आरपीएफ जवानाची मनसे नेत्यासोबत मुजोरी

मोठी बातमी समोर येत आहे, उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी पाहायला मिळाली आहे.

आरपीएफ जवानाने मराठी बोलण्यास नकार दिला

मोठी बातमी समोर येत आहे, उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी पाहायला मिळाली आहे.

आरपीएफ जवानाने मराठी बोलण्यास नकार दिला, तसेच त्यानं या प्रकरणात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम  यांच्याशी हुज्जत घातली.

Related News

एवढंच नाही तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? असा संतापजनक सवाल देखील यावेळी करण्यात आला आहे

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  “मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”,

अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना त्याने ही भाषा वापरली.

उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंग वरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी
मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे तिथे गेले असता एका आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली.
त्यावरून ‘मराठीत बोला’ असं सचिन कदम यांनी म्हटलं असता, मला मराठी येत नाही, असं त्याने म्हटलं.
त्यावर याबाबत मी डीआरएमकडे तक्रार करतो, असं सचिन कदम यांनी म्हणताच – जा माझी तक्रार करा,
अशी मुजोरीची भाषा या आरपीएफ जवानाने वापरली. तर त्यानंतर तिथे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्यानेही
‘त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला’, असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जीआर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे,
असं मनसे नेते सचिन कदम यांनी त्यांना सांगितलं. त्यावर ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?
’ असा संतापजनक सवाल या मराठी आरपीएफ अधिकाऱ्याने केला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून
याप्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे

Related News