नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागपूर जिल्ह्यातील चर्चित गोळीबार कांड पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी

बातमी समोर आली आहे. यातील मुख्य आरोपी शेखू अझहर यास खापरखेडा पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील चर्चित गोळीबार कांड पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

Related News

यातील मुख्य आरोपी शेखू अझहर यास खापरखेडा पोलिसांनी अटक केली आहे.

सावनेर रस्त्यावरील लाहोरी बार समोर मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी या दोघांना अटक केली.

या गोळीबार घटनेत आतापर्यंत सात आरोपी खापरखेडा पोलिसांनी अटक केलीय.

दोन जानेवारी रोजी पवन हिरणवारची नागपूर जिल्ह्यातील बाबुळखेडा शिवारात हत्या करण्यात आली होती.

दोन वर्षांपूर्वी शेखुच्या भावाची हिरणवार टोळीनं हत्या केली होती.

त्याचाचं बदला घेण्यासाठी शेखू नं दोन जानेवारी रोजी बाबुळखेडा शिवारात पवन हिरणवारला एका

निर्जन रस्त्यावर घेरून गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी

सुरुवातीला चार आरोपींना अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी शेखु फरार होता.

दरम्यान काल रात्री पोलिसांनी शेखुलाही अटक केली आहे.

नागपूरच्या खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीत 2 जानेवारी 2025 रोजी

गोळीबाराची घटना घडली होती. बाबूळखेडा शिवारातील निर्जन रस्त्यावर ही घटना घडली होती.

या गोळीबारात पवन हिरणवारचा मृत्यू झाला होता.

तर गँगवारमधून हा गोळीबार करण्यात आल्याचे पुढे आले होतं.

संशयित आरोपी शेखु खान यांने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता.

बाभुळगाव शिवातून मृतक आपल्या मित्रांसोबत कारने जात

असताना चार ते पाच दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कार अडवून मृतक व त्याच्या मित्रांना बाहेर काढले.

त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर देशी कट्ट्याने गोळीबार केला.

यात  पवन हिरणवार याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/the-biggest-proof-against-valmik-tax-is-in-front-of-jitendra-awhad-kadadale-police-and-fadnavis-are-searching-for-another-good-time/

 

Related News