पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार?

पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार?

पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना

विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि

Related News

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पाच दिवसांपूर्वी पारनेर

पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील सुमारे 17 हजार

सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित आहे.

या गुन्ह्यातील घोटाळ्याची व्याप्ती सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांच्या पेक्षाही अधिक असून या

गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी एसआयटीची नेमणूक करावी अशी मागणी साखर कारखाना बचाव समिती

आणि शेतकऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. अन्यथा पारनेर पोलीस स्टेशन

समोर  27 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर

कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी

रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण केला होता.

विक्रीची बेकायदा प्रक्रिया झाली होती. कारखान्याचा विक्रीसाठी केवळ पाचशे रुपये

मुद्रांक शुल्क देऊन सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता. ज्या तारखेला कारखान्याची

विक्री केली त्याच तारखेला क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत

घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्ज पुरवठा केला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/what-kind-of-condition-did-you-see-in-uddhav-thackerays-bedroom-sanjay-shirsats-tongue-tingled/

Related News