तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाल्याचं

पाहायला मिळत आहे. युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री

उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची

Related News

शिफारस सरकारच्या वतीनं राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

तसेच, त्यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त नियोजन आणि

विकास खात्यांचं वाटप करण्यात आलं आहे. राज्यपालांनी

मुख्यमंत्र्यांच्या शिफारसी स्विकारल्या असून उदयनिधी यांची

उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान,

तामिळनाडूचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी व्ही. सेंथिल बालाजी,

डॉ. गोवी आणि आर. राजेंद्रन, थिरू एसएम नस्सर यांच्या

समावेशासह उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त

करण्याची शिफारस राज्यपालांना केली आहे. नवे मंत्री आणि

उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दुपारी 3.30 वाजता

राजभवन, चेन्नई येथे होणार आहे. तसेच, तामिळनाडू सरकारनं

नुकतंच सर्वोच्च न्यायालयातून जामिनावर सुटलेल्या सेंथिल

बालाजी यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/inauguration-of-punyatil-underground-metro-modikandu/

Related News