जर महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांची लेक सुद्धा सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या पोरी-बाळींचं काय?
असा प्रश्न खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनाच विचारायला लागणार हे सर्वात मोठ दुर्दैव आहे.
मुलीला छेडणाऱ्या गुंडांना अटक करा, म्हणून स्वतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना पोलीस स्टेशन गाठावे लागले.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
गुंड कशी पोसली जाताय? असा सारा पाढा रक्षा खडसे यांनी वाचला. तक्रारीनुसार खडसेंच्या नातीसोबत नेमकं काय घडलं?
मुक्ताईनगरच्या कोथळी गावात दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला मोठी गर्दी उसळते. कोथळी गाव हे एकनाथ खडसे यांचं मूळ गाव आहे.
जत्रेतल्या पाळण्यामध्ये बसण्यासाठी रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी गेल्या.
त्यांच्यासोबत खडसे यांचा सुरक्षा रक्षक पोलीस सुद्धा दिमतीला होता. तिथेच काही पाच ते सहा टवाळखोर पोरे आली.
आधी मुली ज्या पाळण्यात बसल्या त्याच पाळण्यात पोरांनी बसण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मुलींच्याच बाजूच्या पाळण्यात बसलेल्या लोकांना उठवून ती पोरे तिथे बसली.
पाळणा सुरू झाल्यानंतर त्यांनी मुलींचे व्हिडिओ आणि फोटो काढले. एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल सुद्धा केला.
ही गोष्ट पोलीस सुरक्षा रक्षकांना खटल्यानंतर त्याने पोरांकडचा मोबाईल मागितला. तेव्हा पोलिसांची कॉलर पकडून त्यालाच दमदाटी करण्यात आली.
या सह मुलीं सोबत सुद्धा छेडछाड केली. अनिकेत भोई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अतुल पाटील, किरण माळी आणि सचिन पालवे अशी आरोपींची नावे आहेत.
यापैकी अनिकेत भोईची याआधीची पार्श्वभूमी विविध गुन्ह्यांची राहिली आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर यातला एक आरोपी पीयूष मोरे याला फोनद्वारे खासदार रक्षा खडसे यांनी जाबही विचारलाय.
त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/khara-mavatch-ha-karu-karu-karu-chhava/