महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची नांदी!

काही

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या

पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा

निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. अशातच राज्याच्या राजकारणात

Related News

अजून एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यात तिसऱ्या आघाडीसाठी

प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी

पुढाकार घेतला आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली.

स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू,

भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व इतर छोट्या

पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, मविआ असो किंवा महायुती असो जे राजकारण सुरु आहे ते

महाराष्ट्राला आवडणारं नाही. बच्चू कडू परखड व्यक्तीमत्व आहेत.

आम्ही एकत्र यायला लागलोय चर्चा सुरु आहे. मनोज जरांगेशी पण भेट

घेतली सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्राला एक चांगला पर्याय महाराष्ट्राला

देण्यासाठी चर्चा सुरु आहेत. मी कोणाच्या सोबत नव्हतो. सगळ्यांसाठी आमची

दार उघडी आहेत. कॉमन मिनिमम अजेंडा घेऊन आमच्या हालचाली

सुरु झाल्या आहेत. आमचं अस्तित्व आगामी विधानसभा निवडणुकीत असेल, असेही ते म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/yupis-new-social-media-policy-janamthep-if-anti-national-posts-are-made/

Related News