Maharashtra Karnataka conflict : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी आणि चालकाला काळे फासण्याच्या
घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्रतून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्गात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसवर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालकास मारहाण केल्याची घटना घडली होती.
Related News
त्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहे.
पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेस अडवून त्यांना काळे फासले आहे.
दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून कर्नाटक पासिंग गाड्या पार्किंगमधून बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे.
एसटी चालकाला कन्नड येते का? असे विचारात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.
त्यानंतर त्याच्या चेहऱ्याला काळ देखील फासण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात लक्ष्मीनारायण
थिएटर येथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. कर्नाटकच्या एसटी बसला काळ फासत आहेत.
शिवसैनिक हातात दगड घेत ड्रायव्हरला खाली उतर असा दम देत आहे.
शिवसैनिकांचा इशारा
कर्नाटकात महाराष्ट्रीय व्यक्तीला मारहाण केली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री काय करत आहे?
सध्या फक्त आम्ही एसटीला काळे फसत आहे. यानंतर मोठे आंदोलन करु, असे शिवसैनिकांनी यावेळी सांगितले.
कर्नाटकच्या गाड्या फोडू, बसेस जाळू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.
महाराष्ट्राने वाहतूक थांबवली
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी आणि चालकाला काळे फासण्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले.
महाराष्ट्रतून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली आहे.
शनिवारी सकाळी दहानंतर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणारी वाहतूक थांबवली आहे.
परिस्थिती पाहून एसटी सेवा पूर्ववत सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान कोल्हापूर शहरातही शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.
बस स्थानकाबाहेर कर्नाटकच्या बसेस आडवण्यात आल्या.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी
चर्चा करणार असल्याचे सांगितले. गावगुंडाने प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली,
हे बरोबर नाही तुमच्या देखील बसेस महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात कर्नाटक सीमावाद आजचा नाही.
एकनाथ शिंदे यांनी 2 महिने कारावास भोगला आहे, असे सरनाईक यांनी म्हटले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/maha-kumbh-2025-punyasathi/