काल एका कॉनक्लेव्हमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे)
म्हणाले की पुढल्या एक दोन वर्षांत मुंबई पॉटहोल मुक्त करू, पण
ही तर त्यांची जुनीच टेप आहे. जवळपास अडीच वर्षांपासून त्यांचं
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
हे घटनाबाह्य सरकार सत्तेवर आहे, गेल्या वर्षीचा किंवा या वर्षीचा
रास्ता घोटाळा असेल, दोन्ही आम्ही एक्स्पोज केलं. पण अजूनही
रस्ते खोदून ठेवले आहेत,अर्धा किलोमीटर देखील रस्त्याच्या
काँक्रिटीकरणाचं काम झालेलं नाही असे सांगत शिवसेना (उबाठा
गट) नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारवर
निशाणा साधला. एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच
पाहिले नाहीत अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. काल संध्याकाळापासून महाराष्ट्रात,
मुंबईत जोरदार पाऊस झाला. काही मिनिटांच्या पावसात राज्यात,
मुंबईतही अनेक भागांत पाणी साचलं,लोकांचे हाल झाले. मुंबई
असो किंवा ठाणे, पुणे या शहरांकडे लक्ष देण्यासाठी कोणीही
नाहीये,तेथे वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाहीत. मुंबई अक्षरश: ठप्प
झाली. अनेक ठिकाणी ट्राफिक कोंडी झाली, रेल्वेतूम प्रवास
करणाऱ्यांचे हाल झाले, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीच पाहिलं
नाही. काल पालिकेचा एकही अधिकारी दिसला का? पोलिस
यंत्रणा कुठे होती माहीत नाही, पालक मंत्री कुठे होते, वेस्टन
एक्सप्रेस हायवे पाण्याने कसा भरला ? असे प्रश्न विचारत
आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.
Read also:https://ajinkyabharat.com/torrential-rains-caused-damage-in-the-state/