‘महाराष्ट्रात 20 हजार रोजगार, रिक्षा-टॅक्सी चालकांना 10 हजार अनुदान’, प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा!

'महाराष्ट्रात 20 हजार रोजगार, रिक्षा-टॅक्सी चालकांना 10 हजार अनुदान', प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा!

Pratap Sarnaik on Maharashtra Jobs: महाराष्ट्रातील रोजगारासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

Pratap Sarnaik on Maharashtra Jobs: महाराष्ट्रातील रोजगारासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

तसेच रिक्षा टॅक्सीचालकांनादेखील त्यांनी आनंदाची बातमी दिलीय. ई बाईक धोरण,

Related News

बाईक टॅक्ससंदर्भातही त्यांनी महत्वाची अपडेट दिलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ई बाईक धोरण महाराष्ट्रात स्वीकारले जाईल. बाईक टॅक्सी महाराष्ट्रात सुरू होईल,

अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीय. महिला सुरक्षेच्यादृष्टीने काही नियमावली बनवण्यात आली आहे.

पावसात भिजू नयेत म्हणून ई बाईक आणल्या जातील, असेही ते पुढे म्हणाले.

महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक पर्याय आणला जात आहे.

असे असले तरी त्यांचे दर काय असतील याबाबत अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले.

पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आनंदाची बातमी दिलीय.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना  दहा हजार अनुदान द्यायचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात 20 हजार रोजगार

महाराष्ट्रात 20 हजार रोजगार तयार होतील. 10 हजारांहून अधिक रोजगार

निर्मिती मुंबईतच निर्मिती होणार असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.

एसटी बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या चालकाचे निलंबन

एसटी बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणा-या चालकाला एसटी महामंडळानं बडतर्फ केलं आहे.

शनिवारी सायंकाळी 7 वाजता दादरहून स्वारगेटला खासगी ई-शिवनेरी बस निघाली.

या बसचा चालक रात्री लोणावळ्याजवळ बस चालवत असतानाच चक्क क्रिकेट मॅच पाहत होता.

त्याचा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशानं रेकॉर्ड करुन, तो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवला.

त्यावर सरनाईक यांनी अधिका-यांना तातडीनं कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणं, आणि बेशिस्तपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकाला बडतर्फ करण्यात आलंय.

तर संबंधित खासगी संस्थेला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई केली जात असल्याचं ट्विट केलं होतं.

परिवहन खात्याचा कारभार हातात घेतल्यापासून प्रताप सरनाईक अनेक महत्वाचे निर्णय घेत आहेत.

Related News