महाराजस्व समाधान शिबिर यशस्वी

शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद

सेवा पंधरवाडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिर मध्ये यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली आणि जनसंवाद साधण्यात आला.

कार्यक्रमातील प्रमुख बाबी:मा. आमदार प्रकाश भारसाकडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून शेतरस्ते मोकळे करण्यासंबंधी शासनाची भूमिका स्पष्ट केली.आकोटचे तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी शेत रस्ते मोजणी व सीमांकन, तसेच महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.ना. तहसीलदार सुधीर थेटे यांनी प्रास्ताविक केले तर दुय्यम निबंधक कुलकर्णी यांनी नोंदणी व शासनाच्या योजना स्पष्ट केल्या.उप अधीक्षक भूमी अभिलेख पालवे साहेब यांनी पांदण रस्ते मोकळे करण्यासंबंधी माहिती दिली.शेत पांदण रस्ते समितीचे सदस्य सतीश बोंद्रे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचा चेक मा. आमदार प्रकाश भारसाकडे व मा. तहसीलदार चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

 अन्य सेवा व उपक्रम:जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा, अपाक नोंदी, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्न दाखले, भूमी अभिलेख विभागाचे सनद वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी निलेश देऊळकार यांनी केले.नियोजन मंडळ अधिकारी होपळ साहेब, के. डी. पवार, किशोर सोलकर, धावणे मॅडम यांनी केले.विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले, जेथे नागरिकांना थेट माहिती मिळाली.

नायब तहसीलदार मानकर साहेब, सहा. गटविकास अधिकारी खुमकर साहेब

सरपंच दिगंबर पिंपराळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जगन पाटील निचळ

ग्रामसेवक डाबेराव, आबोडा ग्रामसेवक संतोष बावणे

कृषी सहाय्यक करण सिंग आसोले, सर्वेयर रुपेश राऊत

सामाजिक कार्यकर्ते रमण निचळ, राहुल वानखडे, सुदेश लोखंडे, वैभव आखरे, श्रीकांत तेल्हारकर, करण ठाकूर

मंडळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

read also:https://ajinkyabharat.com/swami-chaitanyanandchaya-kyya-karyancha-expose/