नेपाळमध्ये महापूर!

नेपाळची राजधानी काठमांडू येथील सखल भाग रविवारी

मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलन

झाले. ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्या

Related News

प्रमाणावर हानी पोहोचली. हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील

विविध भागात महापूर आला आहे. ज्यामुळे शेकडो नागरिकांचा

मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. जून ते सप्टेंबर

दरम्यान पडणारा मान्सून पाऊस अनेकदा संपूर्ण दक्षिण

आशियामध्ये प्राणघातक पूर आणि भूस्खलन घडवून आणतो.

पाठिमागिली काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांवरुन निर्सर्गाचा एक

पॅटर्न निरीक्षकांच्या लक्षात आले आहे. दरम्यान, तज्ञांनी असा

इशारा दिला आहे की हवामान बदलामुळे या आपत्तींची वारंवारता

आणि तीव्रता वाढत आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत आणि रस्ते

आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

त्याचाच एक परिणाम म्हणून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग

शुक्रवारपासून पाण्याखाली गेला आहे. मान्सून पावसामुळे नैसर्गिक

अढथळे निर्माण होत असल्याने मदत पोहचविण्यास विलंब होतो

आहे. परिणामी मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. पोलिस प्रवक्ते

दान बहादूर कारकी यांनी ए. एफ. पी. ला सांगितले की बेपत्ता

व्यक्तींचा शोध सुरू आहे आणि आणखी बरेच जण दुर्गम भागात

अडकले असण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या 101 वर

पोहोचली असून 64 जण बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती

आहे. पण, अद्याप माहिती उपलब्ध नसलेल्या पण बेपत्ता

असलेल्यांची संख्या शेकडोंमध्ये असू शकते. आमचे शोध आणि

बचाव कार्य प्रभावित भागात सुरू आहे. स्थानिक हवामान

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूमध्ये केवळ 24 तासांत

240 मिलीमीटर पाऊस पडला, जो 1970 नंतर शहरातील

सर्वाधिक नोंद झालेला पाऊस आहे. बागमती नदी आणि तिच्या

उपनद्या ओसंडून वाहू लागल्या, त्यामुळे जवळपासची घरे आणि

वाहने पाण्याखाली गेली, ज्यामुळे रहिवाशांना उंचावर स्थलांतरीत

व्हावे लागले. मदत पथकाने आतापर्यंत 3,300 लोकांची सुटका

केली आहे, परंतु अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत.

बचावकार्यात मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि मोटार

बोटींसह 3,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात

आले आहेत आणि वाचलेल्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी

राफ्टचा वापर केला जात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/covid-warrior-family-members-one-crore-rupees-cm-atishi/

Related News