LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं.
या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर चर्चा झाली.
त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. क्रिकेट फॅन्स याची तुलना मागच्यावर्षी केएल राहुल सोबत झालेल्या संभाषणाशी करत आहेत.
Related News
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घट...
Continue reading
सोन्याच्या किमतीत 18% वाढ; गुंतवणूकदारांना नफा, पण पुढे दर कोसळणार?
गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून,
सध्या तो ₹90,000 प्रति 10 ग्रॅमच्या व...
Continue reading
संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले
आमदार प्रशांत बंब हे शिक्षक विरोधी भूमिकेमुळे महाराष्ट्राला सुपरिचित झालेत.
शिक्षक शाळेत शिकवित नाह...
Continue reading
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ हा चित्रपट
ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या काही दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली,
मात्र त्यानंतर प्...
Continue reading
नवी दिल्ली: अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी लोकसभेत
माजी कृषिमंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर 'भारतरत्न'
पुरस्काराने सन्मानित कर...
Continue reading
अकोट तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यांच्या समस्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन कराव्यात,
अशी जोरदार मागण...
Continue reading
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रा...
Continue reading
शाळेची मधातली सुट्टी झालेली. हळूहळू दुपार टळू लागतेय. सुट्टीमुळे पोरे उनाड वासरासारखी घराकडे पळालेली!
मी निवांतपणे वर्गात बसलेलो असतोय... एवढ्यात मला आठवतंय,
काल आलेले बरेचसे...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजिकच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन
येथे आज पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे संपूर्ण परिसर अंधारात होता.
या संधीचा फायदा घेत हिंस्र वन्य प्राण्या...
Continue reading
आरोग्य हेच खरे संपत्ती आहे! उत्तम आरोग्यासाठी तुमच्या दैनंदिन सवयी सुधारायला हव्यात.
पौष्टिक आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, आणि मानसिक स्वास्थ्य यांची
योग्य काळजी घेतल्यास तुम...
Continue reading
मुंबई बोरिवली मधुर एक धक्कादायक घटना समोर आली.
प्रवाशांना वापरल्या जात असलेल्या लेन मध्ये अडचण आणल्याच्या वादावरून एका
पुरुषाने महिलेच्या घराला आग लावल्या ची घटना घडली आहे.
...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी विशाल आग्रे): तालुक्यातील सावरा गावात अरुण शालीग्राम सपकाळ यांच्या
घराला 2 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक भीषण आग लागली.
रात्री 1 वाजता लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण...
Continue reading
IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात
विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला.
एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला.
लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते.
पण त्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. लखनऊला आपलं टार्गेट डिफेंड करता आलं नाही.
या सामन्यानंतर असं काही घडलं की, ज्याने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर फ्रेंचायजी मालक संजीव गोयनका मैदानावर दिसले.
संजीव गोयनका मागच्या सीजनच्यावेळी सुद्धा चर्चेत होते. LSG च्या पराभवानंतर मैदानातच त्यांचा कॅप्टन
केएल राहुल बरोबर वाद झाला होता. यावेळी ते पंतला काहीतरी सांगताना दिसले.
दोघांमध्ये काहीवेळ बोलणं झालं. टीमचे हेड कोच जस्टिन लँगर सुद्धा या चर्चेमध्ये दिसले.
या चर्चेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
केएल राहुल लखनऊपासून का वेगळा झाला?
2024 आयपीएल सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता.
सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर संजीव गोयनका यांनी केएल राहुलला सुनावलं होतं.
या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यानंतर बातमी आलेली की,
केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. त्यानंतर आता
चालू असलेल्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला.
आशुतोष शर्माची स्फोटक इनिंग, मॅच फिरली
लखनऊने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 209 धावा केल्या.
निकोलस पूरनने सर्वाधिक 75 आणि मिचेल मार्शने 72 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 27 धावांच योगदान दिलं.
प्रत्युत्तरात दिल्लीच्या टीमने 6.4 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 5 विकेट गमावलेले.
त्यानंतर आशुतोष शर्मा एक स्फोटक इनिंग खेळला. त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.