कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण पर्व असते.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठावरून सादर करण्याची संधी मिळते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आणि सांस्कृतिक गाण्यांवर वैयक्तिक व सामूहिक
नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय फॅन्सी ड्रेस स्पर्धा,
कविता सादरीकरण, भाषणे अशा विविध कलाप्रकारांनी कार्यक्रम रंगतदार झाला.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.
उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका कल्याणी मनोज शेरे, प्रिया मोहन बकाल,
अपेक्षा मनोज शेरे, तसेच ग्रामपंचायत सरपंच प्रविण मोरे, पोलीस पाटील शरद बकाल,
सैनिक प्रदीप मोरे, पत्रकार संतोष मोरे, शहबाज देशमुख, श्रीकृष्ण पवार, अनिल बकाल,
नरहरी बाजोडकर, राजू बाजोडकर, प्रशांत राठोड, शबदर पटेल, दत्ता बकाल,
विशाल मोरे, अशोक मोरे, इब्राहिम देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली.
ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण स्नेहसंमेलन
आनंददायी वातावरणात पार पडले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी
केलेल्या परिश्रमांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.