मुंबईत गुरुवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने
नवरात्रोत्सवाच्या उत्सवावर विरजण पडले. याशिवाय शहरातील
सामान्य कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाला. अचानक
Related News
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
बैलाचा जागीच मृत्यू झाला
आलेल्या या पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी, पाणी
तुंबणे, वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या दिसून आल्या
आहेत. मुसळधार पावसामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना
करावा लागला. पाणी साचल्याचे आणि वाहतूक कोंडीचे अनेक
व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ठाणे-मुलुंड, दादर, अंधेरी, वांद्रे, बोरिवली यांसारख्या मुंबईतील
अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या
अनपेक्षित हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान खात्याने
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि पुण्यासाठी यलो अलर्ट जारी
केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ३ ते ४ तासांत
मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विशेषतः ठाणे-मुलुंड, मुलुंड-कुर्ला, घाटकोपर, दादर, वरळी आणि
बीकेसीमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांना
सावध राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला
देण्यात आला आहे. IMD ने 11 ऑक्टोबरसाठी पिवळा अलर्ट
देखील जारी केला आहे, याचा अर्थ येत्या काही दिवसांतही
मुसळधार पाऊस पडू शकतो.