“जीवन सुंदर आहे, ते आनंदाने जगता आले पाहिजे.

राष्ट्रीय सेवा योजना युवकांचा सर्वांगीण घडवते

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युवकांचा  सर्वांगीण घडवते. यातून विद्यार्थी स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. आयुष्यात यश मिळवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. “हार मानू नका, वर्तमानात जगा आणि स्वतःवर विश्वास ठेवा,” असे प्रेरणादायी विचार बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. मनोज उघडे यांनी व्यक्त केले.ते संत गजानन महाराज महाविद्यालय, बोरगाव मंजू येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन

२४ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रा.डॉ. पूजा सपकाळ होत्या. व्यासपीठावर प्रा. डॉ.राठोड, प्रा.वासुदेव डांगे,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आकाश डोंगरे,दामिनी पथकाच्या पूजा बोकरे, तसेच समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रतिमा चोटमल, वैष्णवी टेकाम, ऐश्वर्या लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

पी.एस.आय. उघडे यांचे मार्गदर्शन

पी.एस.आय. उघडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले –

“जीवन सुंदर आहे, ते आनंदाने जगता आले पाहिजे. आपल्याकडे असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा. ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे पाहून आपण भाग्यवान असल्याची जाणीव ठेवा.राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देते आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे माध्यम बनते.”

प्राचार्यांचे अध्यक्षीय भाषण

अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. पूजा सपकाळ म्हणाल्या –

“विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करावी. प्रत्येकाने आपल्या घराच्या दारात एक झाड लावून वृक्षारोपणाची सवय लावावी. लहान कृतीतून मोठा बदल घडवता येतो.”

कार्यक्रमाचा शेवट

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राठोड यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. निर्मळ यांनी केले.
या वेळी स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनएसएस सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना सामाजिक भान, जबाबदारी आणि नेतृत्वाचे धडे देतात. अशा कार्यक्रमांमुळे तरुणाईमध्ये सेवाभावाची भावना दृढ होते. 

read also : https://ajinkyabharat.com/widow-aani-childless-hindu-mahilechaya-mortantant-malamatta-sarachayankadech/