लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे. हे पैसे काढण्यासाठी पोस्ट
ऑफिसमध्ये महिला गर्दी करत आहेत.लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी नंदुरबारमध्ये महिलांची तुफान गर्दी झाली आहे.
पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांची मोठी रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Related News
होळी सणाच्या खरेदीसाठी अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर सकाळपासून महिलांनी मोठी गर्दी केली आहे.
होळी सणानिमित्ताने लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनं लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता जमा केला आहे.
लाडक्या बहिणींनी 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक ठिकाणी सरकारला केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं लाडकी बहिण योजना सुरु केली होती.
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सरकार लाभार्थी महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची मदत देते.
होळी सणानिमित्ताने लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.