कुवेत अग्नितांडवात दगावलेल्या 31 नागरिकांचे पार्थिव केरळात दाखल !

कुवेत

कुटुंबीयांचा आक्रोश; विमानतळावर सरकारची मानवंदना

कुवेतमधील अग्नितांडवात मरण पावलेल्या ३१ भारतीय नागरिकांचे पार्थिव

Related News

हवाई दलाच्या विशेष विमानातून मायदेशी आणण्यात आले.

मृतांमध्ये २३ मल्याळी नागरिकांचा समावेश आहे.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्यमंत्र्यांनी विमानतळावरच आदरांजली वाहिली.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुवेत येथील दुर्घटनेत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला होता.

हवाई दलाच्या ‘सी- १३०जे’ या विमानातून ते पार्थिव मायदेशी आणण्यात आले.

या ३१ पार्थिवामध्ये केरळमधील २३ नागरिक, ७ तमिळी नागरिक

आणि कर्नाटकातील एका नागरिकाचा समावेश आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले,

“अनिवासी भारतीय नागरिक हे केरळची जीवनरेखा आहेत.

कुवेतमधील दुर्घटनेत एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय नागरिक मरण पावणे

हे धक्कादायकच आहे.

मृतांच्या कुटुंबीयांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेनंतर कुवेतचे सरकार आणि भारतातील केंद्र सरकारने देखील

उत्तम पद्धतीने समन्वय ठेवून काम केले.

अशा प्रकारच्या दुर्घटना या भविष्यात होऊ नये म्हणून

कुवेत सरकार उपाययोजना आखेल अशी अपेक्षा करतो.”

हे पार्थिव भारतात आणल्यानंतर कोची विमानतळावर

केंद्रीय पर्यटन आणि पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री सुरेश गोपी उपस्थित होते.

या पार्थिवाला विमानतळावरच मानवंदना देण्यात आली.

कोची विमानतळाच्या बाहेर पार्थिव नेण्यासाठी ३५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

यावेळी मृतांच्या कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश दिसून आला.

प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

मृतांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांची

वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी राज्यातील मंत्री के. राजन, पी. राजीव आणि

वीणा जॉर्ज हे समन्वय साधताना दिसून आले.

विरोधी पक्ष नेते व्ही.डी. सतीशन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Read also : पवार – ठाकरे – पटोलेंची आज एकत्र पत्रकार परिषद (ajinkyabharat.com)

Related News