ग्रामीण भागातील मेहनती विद्यार्थिनीचे यश!

ग्रामीण

मूर्तिजापूर : शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली ओळख प्रस्थापित करताना अनेकांना प्रेरणा दिली आहे. हातगाव येथील स्नेहा सुनिल सातींगे हिने नुकतीच एमबीबीएस प्रवेश परीक्षेत यश संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविला आहे.

स्नेहा ही अत्यंत अभ्यासू, मेहनती आणि ध्येयवेडी विद्यार्थिनी असून, तिचे वडील सुनिल सातींगे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. आर्थिक अडचणींच्या काळातही त्यांनी आपल्या मेहनती आणि जिद्दीच्या जोरावर मुलीला उच्च शिक्षण दिले. स्नेहाने अथक परिश्रम घेत आपले बालपणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
या उल्लेखनीय यशाचे श्रेय स्नेहाने आपल्या आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे. तिच्या या कामगिरीमुळे हातगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातून तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्नेहा सातींगे ठरली प्रेरणादायी आदर्श “मेहनत आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते,” हे तिने सिद्ध केले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/of-savitryachya-lekki-group-to/

Related News

Related News