कोंडोली शाळेत नवख्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पांनी स्वागत!

कोंडोली शाळेत नवख्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पांनी स्वागत!

कोंडोली (प्रतिनिधी):

श्रीक्षेत्र कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २३ जून रोजी पहिल्या इयत्तेतील नविन प्रवेश

घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या नव्या सत्राचा प्रारंभ अत्यंत उत्साहात झाला.

Related News

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल भवाळ हे होते.

यावेळी शिक्षण विभागाचे जी. आर. आडे सर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम तायडे,

आशिष इंगोले, गणेश भवाळ, अनिल भवाळ, कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.

सुदाम तायडे यांच्या हस्ते वर्ग १ ते ४ मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (पेन, लेटर बुक) वाटप करण्यात आले.

प्रत्येक नवख्या विद्यार्थ्याला गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर खाऊचे वाटप देखील करण्यात आले.

मुख्याध्यापक भूषण जाधव सर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. यावेळी अंगणवाडी सेविका चव्हाण बाई,

मदतनीस भवाळ बाई, सहशिक्षिका गिऱ्हे बाई, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची उस्फूर्त उपस्थिती आणि सुशोभित शाळा परिसर पाहून सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

Read Also :    https://ajinkyabharat.com/ghodgaon-blood-episode/

Related News