बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा तालुक्यातील कोलवड गावात हृदयद्रावक घटना घडली असून, दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले ६०
वर्षीय हरिभाऊ जाधव यांचा मृतदेह आज कोलवडजवळील नदीपात्रात आढळून आला आहे.
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
हरिभाऊ जाधव हे दोन दिवसांपूर्वी शेतामध्ये गेले होते, मात्र रात्रीपर्यंत घरी परतले नाहीत.
नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, अखेर काल बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली होती.
बुधवारी सकाळी गावाजवळील नदीपात्रात मृतदेह दिसून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
गावकऱ्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
शेतावरून परतताना नदी ओलांडताना पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला असावा,
असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोलवड गावात शोककळा पसरली आहे.
हरिभाऊ जाधव हे एक शांत, कष्टकरी शेतकरी म्हणून गावात ओळखले जात होते.
पुढील तपास बुलढाणा पोलिसांकडून सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/beedmadhya-dhakkadayaka-incident-buried-dead/