कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

आरजी कर

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील

प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा तपास करण्यासाठी

केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे एक पथक कोलकाता येथे दाखल झाले आहे.

Related News

कोलकाता उच्च न्यायालयाने  प्रकरण केंद्रीय एजन्सीकडे

हस्तांतरित करण्याचे आदेश दिल्यानंतर एक दिवसानंतर

ही महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. उच्च न्यायालयाने

कोलकाता पोलिसांना सर्व संबंधित कागदपत्रे तातडीने

सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले.

दिल्लीतील एक विशेष वैद्यकीय आणि फॉरेन्सिक पथकही तपासात सहभागी झाले आहे.

दरम्यान, कोलकाता मेडिकल कॉलेजमधील प्रकरण

सीबीआयकडे सोपवल्यानंतरही डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची आंदोलने सुरुच आहे.

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी

करत देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

एम्स दिल्ली येथील निवासी डॉक्टर, इंदिरा गांधी रुग्णालय आणि

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन सह इतर संघटनांनी

केंद्रीय कायदा लागू होईपर्यंत त्यांची निदर्शने कायम राहतील असे म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन च्या

शिष्टमंडळाची भेट घेऊन या घटनेवर चर्चा केली आणि डॉक्टरांची,

विशेषत: महिलांची, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढवण्यासाठी

काय उपाय केले जाऊ शकतात यावर चर्चा केली.

Read also: https://ajinkyabharat.com/religious-freedom-does-not-mean-the-right-to-convert-allahabad-high-court/

Related News