जिद्द, इच्छाशक्ती आणि सहनशक्तीचा अनोखा संगम दाखवत
कोल्हापूरच्या 46 वर्षीय ॲथलीट महेश्वरी सरनोबत यांनी
युरोपमधील एस्टोनिया (टॅलिन) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत
ऐतिहासिक पराक्रम गाजवला. तब्बल 15 तासांत तीन कठीण टप्पे पूर्ण करत त्यांनी
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला.
या स्पर्धेत महेश्वरी यांनी पार केलेले तीन टप्पे –
3.8 किमी पोहणे : तब्बल 5 अंश तापमानाच्या गोठवणाऱ्या समुद्रात.
180 किमी सायकलिंग : वादळी वारे आणि थंड हवामानाचा सामना करत.
42.2 किमी मॅरेथॉन : पूर्ण अंतराच्या मॅरेथॉन धावून.
महेश्वरी यांनी हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करत फक्त 15 तासांत फुल आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली.
चिकाटीने गाठलेलं ध्येय
महेश्वरी सरनोबत यांचा हा पराक्रम म्हणजे केवळ एक क्रीडा यश नाही,
तर कणखर इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि प्रचंड सहनशक्तीचा प्रेरणादायी नमुना आहे.
या कठीण स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी होतात,
मात्र हवामान आणि अवघड मार्गामुळे अनेकांना शेवटपर्यंत पोहोचता येत नाही.
तरीही महेश्वरी यांनी चिकाटीने हे ध्येय गाठले.
त्या भारतातील मोजक्या महिला खेळाडूंमध्ये मोडतात ज्यांनी
अशा कठीण परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर फुल आयर्नमॅन पूर्ण केले आहे.
महाराष्ट्राचा अभिमान
महेश्वरींच्या या कामगिरीबद्दल कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्थानिक क्रीडा क्षेत्राने याला “अविस्मरणीय आणि प्रेरणादायी पराक्रम” अशी दाद दिली असून,
हा क्षण महिलांसाठी आणि नव्या पिढीसाठी एक आदर्श ठरेल, असं मत व्यक्त केलं जात आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/rautanchaya-accusations/