किरण रावचा ‘लापता लेडीज’ चित्रपट सर्वोच्च न्यायालयात दाखवला जाणार

आमिर खानही

आमिर खानही राहणार स्क्रीनिंगला उपस्थित

किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर

चांगली कामगिरी केली नसली मात्र प्रेक्षक आणि समिक्षकांकडून

Related News

या चित्रपटाची चांगली स्तुती ऐकायला मिळत आहे.  या चित्रपटाला

ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली.

आता या चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

हा चित्रपट सर्वोच्च न्यायालयात  दाखवला जाणार आहे.

‘लापता लेडीज’ आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रदर्शित केला जाणार आहे.

यासंदर्भात एक नोटीस देण्यात आली आहे, ज्यामध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगबद्दल

माहिती दिली आहे. निर्माता आमिर खानसह स्वतः किरण रावही या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत.

भारताचे सरन्यायाधीश स्क्रिनिंगला उपस्थित राहतील.

तसेच इतर न्यायाधीश त्यांच्या जोडीदारासह या सिनेमाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत.

हा चित्रपट संध्याकाळी न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर दाखवला जाईल.

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे,

त्यामुळेच ही स्क्रीनिंग होत आहे.  या चित्रपटाच्या स्क्रिनींगनंतर प्रेक्षक आणि

दिग्दर्शक किरण राव तसेच या चित्रपटाचा निर्माता आमिर खान यांच्यासोबत संवाद साधणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/5-coaches-of-goods-train-derailed-in-west-bengal/

Related News