किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान

श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट

किन्हीराजा (वार्ताहर)

येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने श्रीकृष्ण

सोनुने यांनी शाळेला दीड लाख रुपये किंमतीचे आरोप्लॅन्ट भेट दिले. तसेच शालेय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी

Related News

स्टेज व ग्रंथालयासाठी पुस्तके देणाऱ्या श्री गजानन लव्हाळे यांचा श्री शिवाजी शिक्षण संस्था,

अमरावतीचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धनजी देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी आयोजित शाळा समिती सभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री हर्षवर्धनजी देशमुख हे होते.

सभेला संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री गजाननराव पुंडकर, आजीवन सभासद मा. श्री विश्वनाथजी

पोधाडे, मा. श्री माणिकराव गावंडे, मा. श्री बाबुराव बाकल, विशेष निमंत्रित सदस्य

मा. श्री अंबादासजी कुटे पाटील, मा. श्री प्रदीप कुटे पाटील, शाळा तपासणी अधिकारी

मा. श्रीमती राजश्री कासलीकर आणि मुख्याध्यापक मा. श्री बी. जे. शेख यांची उपस्थिती होती.

मुख्याध्यापक बी. जे. शेख यांनी या उपक्रमाबद्दल श्रीकृष्ण सोनुने व श्री गजानन लव्हाळे यांचे

मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रभारी पर्यवेक्षक श्री ए. पी. घुगे यांनी केले.

Related News