मुंबई– बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा अनेकांचा लाडका आहे. त्याने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच त्यांच्या वागण्यातूनही तो किंग खान का आहे याची प्रचिती चाहत्यांना येत असते. चाहते नेहमीच त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. शाहरुख नेहमीच त्याच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतो. आता शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय ज्यात तो त्याचा मुलगा अबरामसोबत दिसतोय. हा व्हिडीओ सोमवारी ईडन गार्डनवर झालेल्या केकेआर आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यादरम्यानचा आहे. या सामन्यासाठी शाहरुखने त्याचा मुलगा अबरामसोबत स्टेडियमवर हजेरी लावली होती. या मॅचदरम्यान अबराम आणि शाहरुख यांच्यामध्ये झालेल्या छोट्याश्या गोड भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्टेडियममधील या व्हिडिओत अबराम आणि शाहरुख मॅच बघताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अबराम वडिलांवर दादागिरी करताना दिसतोय. सुरुवातीला तर त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं होतं. त्यानंतर शाहरुख लाडातच दोन्ही हातांनी आपल्या लेकाचा गळा दाबताना दिसतो. किंवा तसे हातवारे करतांना दिसतो. त्यानंतर अबराम त्याचे दोन्ही हात बाजूला ढकलतो. आणि त्याच्यावर रागावतो. तो शाहरुखच्या दिशेने एक बोट करून जणू त्याला धमकीच देतोय असं करू नका. त्यानंतर शाहरुखही मान हलवतो. या बाप लेकाची ही केमिस्ट्री पाहून चाहते त्यांच्यावर फिदा झाले आहेत. त्यांच्यातील नातं बापलेकाचं नसून मैत्रीचं असल्याचं दिसून येतं. नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘अरे तो म्हणतोय बघा मी बोललेलो ना हा आऊट होणार हा आऊट झाला.’ आणखी एकाने लिहिलं, ‘किती गोड दिसतायत दोघेही.’ दुसर्याने लिहिलं, ‘त्यांना कुणाची नजर लागायला नको.’ आणखी एकाने लिहिलं, ‘वडिलांवर कसा हक्क दाखवतोय.’ शाहरुखच्या कामाबद्द्दल सांगायचं तर तो शेवटचा ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपटात दिसला होता. त्याच्या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला होता.
Related News
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading